उद्योग जगतमहाराष्ट्रराष्ट्रीय
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा प्रथम स्थानावर!
मुंबई : सन २०२४-२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १,१३,२३६ कोटी रुपये इतक्या थेट परकीय गुंतवणुकीसह महाराष्ट्राने देशात पुन्हा प्रथम स्थान प्राप्त केले आहे. ही गुंतवणूक, मागील वर्षाच्या एकूण गुंतवणुकीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात सांगितले.
राज्य विधानमंडळाच्या विशेषअधिवेशनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विधिमंडळ संयुक्त सभागृहात संबोधन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.