बदलापूर अत्याचार घटनेनंतर सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश
लांजा : बदलापूर शाळेतील बालिका अत्याचार प्रकरणानातर राज्य सरकारने आता सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा, खासगी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आणि सुरक्षा महिला कर्मचारी नेमण्याचे आदेश जिल्हा परिषद यांना निर्गमित केले आहेत.
सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना संस्थाचालक आणि जिल्हा परिषद, सर्व सार्वजनिक संस्था यांना देण्यात आले आहेत. शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करण्याबाबत विशेष लक्ष देण्यात आले आहे. सहा वर्षापर्यंत मुलांची काळजी घेण्यासाठी महिला कर्मचारी नेमण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशात शाळेच्या आवार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे केले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज संस्था संचालक आणि मुख्याध्यापक यांनी पडताळणी केले पाहिजे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीबाबत विशेष लक्ष द्यावे. शाळेवर नेमण्यात येणाऱ्या कर्मचारी यांचा पोलिस व्हेरिफिकेशन दाखला घेणे अनिवार्य आहे. शाळेत तक्रारवहीठेवणे, विद्यार्थी सुरक्षा समिती नेमणे, सखी सावित्री समिती नेमणे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय समितीने आढावा घेणे, सुरक्क्षेबाबत शाळेचा हलगर्जीपणा झाल्यास कडक कारवाई करण्याची आदेश दिले आहेत. पालक वर्गांने या निर्णयाच्या स्वागत केले आहे