मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यरत असणारे माध्यमिक शिक्षक मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा यंदाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता.सदर पुरस्कार वांद्रे-मुंबई येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या शानदार शासकीय कार्यक्रमात पर्यटन व महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख एक लाख अकराहजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या वेळी शिक्षक आमदार कपिल पाटील,शालेय शिक्षण विभागाचे सचिव रनजीतसिंह देवोल आदि मान्यवर उपस्थित होते
शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, पत्रकारीता आदी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल ,उपाध्यक्ष रविंद्र लिमये,कार्यवाह गीता पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर व सर्व संचालक, माध्यमिक शि़क्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार, सुधागड विद्यासंकुल कळंबोली चे प्राचार्य राजेंद्र पालवे, उपप्राचार्य बी. डी. कसबे, उपमुख्याध्यापिका सरोज पाटील, कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे, सर्व विभागाचे पर्यवेक्षक तसेच रायगड जिल्हातील सर्व मान्यवर व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य, प्रेम आणि प्रोत्साहनामुळेच हा पुरस्कार जाहिर झाला आहे अशी भावना मनोज पाटील यांनी व्यक्त केली आहे.