महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर धावणार ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस!
महाराष्ट्रातील विविध आगारांमध्ये १२७ चार्जिंग केंद्रे उभारण्यास सुरुवात
मुंबई : पर्यावरण पूरक म्हणून परिवहन क्षेत्रातील बसेसही सीएनजीवर चालवण्याची चर्चा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील सर्वसामान्यांची प्रमुख आधार एसटी बसेसही इलेक्ट्रिकवर धावणार आहे. राज्यातील सत्तारूढ शिंदे भाजप सरकारने राज्यभरात अशा एकूण 5150 बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक बसेस चालवण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील विविध एसटी आगारांमध्ये १२७ ठिकाणी चार्जिंग केंद्रे उभारण्याचे काम सुरु झाले आहे.
इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या एसटी बसेसमुळे इंधन खर्चात बचत होण्यासह पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे