मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषि महाविद्यालय मांडकी – पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस संविधान प्रतिज्ञा घेऊन उत्साहात संपन्न झाला.
26 नोव्हेंबर हा दिवस 2015 पासून नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने साजरा करणे सुरू केले. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतात संविधान स्वीकारले गेले देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांबाबत आदराची भावना वाढवणे हा संविधानाचा उद्देश आहे.
जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.बी.सूर्यवंशी तसेच कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.