महाराष्ट्रलोकल न्यूज

माईणमधील आपदग्रस्त कुटुंबाची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट

  • अनिल सुखटणकर यांच्या घराला वीज गळतीमुळे भीषण आग; वीज गळतीमुळे घर पूर्णतः भस्मसात
  • अंदाजे ६१ लाखांहून अधिक नुकसान

कणकवली :  तालुक्यातील मौजे माईण येथे  २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक झाले असून, एकूण अंदाजे नुकसानाची रक्कम रु. ६१,३४,९००/- इतकी असल्याचे प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर तत्काळ पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री मा. नितेश राणे यांनी माईण गावाला भेट देऊन आपदग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी केली.

या आगीच्या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी, ओटव यांनी तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे. या अहवालास अनुसरून पुढील मदत व कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपत्तीग्रस्त कुटुंबास योग्य ती मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व अधिकारी व वीज मंडळ यांनी आवश्यक पावले उचलावीत,अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button