महाराष्ट्रस्पोर्ट्स

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धेत वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेजला सुवर्णपदक

उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई विद्यापीठांतर्गत एथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथे दि.१६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे, उरण येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या एथलेटिक्स स्पर्धेमध्ये वैयक्तिक १०००० मीटर धावणे आणि ५००० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक – मृणाल मनोहर सरोदे (टी.वाय.बी.कॉम) तर १००००मीटर धावणे स्पर्धेत आणि ३००० मीटर धावणे ट्रिपल चेस स्पर्धेत तृतीय क्रमांक – प्रेम संतोष ठाकुर (एम.ए.)याने पटकाविला.


या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, सुधीर घरत, भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले त्यांना जिमखाना प्रमुख डॉ. विलास महाले, देवेंद्र कांबळे यांचे मागर्दर्शन लाभले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button