महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेसाठी लांजा येथे रविवारी शिबिर
लांजा नगर पंचायत, महसूल विभाग व एकात्मिक बालविकास विभाग अंतर्गत उपक्रम
लांजा : “मुख्यमंत्री–माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत लांजा नगर पंचायत, महसूल विभाग व एकात्मिक बालविकास विभाग अंतर्गत दि.०७/०७/२०२४ रोजी गणेश मंगल कार्यालय, लांजा (आग्रे हॉल) येथे सकाळी १०.०० वाजलेपासून शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. तसेच शिबिराबाबत प्रभागातील महिलांनी या योजनेसाठी खालील नमूद सर्व कागदपत्रांसहित उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- १) लाभार्थ्यांचे आधार कार्ड
- २) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- अ) अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड
- ब) मतदान ओळखपत्र
- क) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- ड) महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
- ३) पांढरे रेशनकार्ड धारक यांना सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला.
- पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक यांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही.
- (वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
- ४) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत(बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
- ५) रेशनकार्ड.
- ६) पासपोर्ट साईज फोटो
- ७) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.