या वर्षीची मार्लेश्वर यात्रा १३ ते १५ जानेवारी दरम्यान
संगमेश्वर तालुका प्रशासनाकडून तयारीचा आढावा
देवरू़ख : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिध्द श्री देव मार्लेश्वर यात्रेचे वेध सर्व भाविकांना लागले आहेत. या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांनी देवस्थानचे मानकरी, गावकरी. यांच्यासह सा. बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पोलिस यांच्यासमवेत तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक सपंन्न झाली.
या वर्षी मार्लेश्वर यात्रा १३ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत आहे. दि १५ रोजी मार्लेश्वर व गिराजा देवी यांचा विवाह संपन्न होणार आहे.. या यात्रे निमित्त येणारे भाविकांना सोई सोई सुविधा मिळाव्यात व त्याचा प्रवासही सुखकर व्हावा, यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार असलेल्या मानकरी, कुमकरी, यांच्यासह भाविक यांची गैरसोय न होता सर्व यात्राकाळात दरवर्षीप्रमाणे गडबड. गोंधळ न होता सर्व नियोजन करून यात्रासुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आपपली जबाबदारी ओळखून काम करून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.