राज्यभर आज समूदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं ‘कामबंद आंदोलन’
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली
देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करत राहिल्याने आज समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारलं आहे.
समुदाय आरोग्य अधिकारी यांना सेवक कायम करून त्यांना ब दर्जा देणेत यावा, लाँयल्टी बोनस, बदलीसाठी धोरण निश्चिती,कामावर आधारीत इनडोअर भत्ता रद्द करावा, आदी मागण्यांची दखल न घेतल्याने जिल्हय़ात व प्रत्येक तालुक्यात आज काम बंद आंदोलन करणेत येत आहे राज्य सचिव डाँ. अभिषेक नागरगोजे यांनी दिला आहे.
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राज्यातील 10 हजारांच्या वर आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज कामबंद आंदोलन पुकारलं आहे. जर सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्य सचिव डाँ. अभिषेक नागरगोजे यांनी तालुका आरोग्य अधिकारी देवरूख यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद. पंचायत समिती कार्यालया समोर हे समुदाय आरोग्य अधिकारी आज निदर्शनं करणार आहेत.
या काम बंद आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे..