रानसई येथे सीएसआर फंडातून शेती अवजारे आणि मच्छीमार बोटींचे लोकार्पण

- ओएनजीसी कंपनी उरण प्लांट चे आदिवासींसाठी स्तुत्य उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रानसई ग्रामपंचायत ही उरण तालुक्यातील १०० टक्के आदिवासी वस्ती असणारी ग्रामपंचायत आहे याठिकाणी खैरकाठी, मार्गाचीवाडी, बंगल्याची वाडी, खोंड्याची वाडी, सागवाडी आणि भुऱ्याची वाडी अशा सहा आदिवासी वाड्या आहेत. या वाड्यामधील ४३० कुटुंबांना प्रत्येकी एक फावडा, एक टिकाऊ, एक पहार एक घमेला, एक पंजा अशी सहा शेती अवजारे आणि पाच मच्छीमार आदिवासीना विनायांत्रिकी बोटींचे लोकार्पण करण्यात आले
यावेळी ओ एन जी सी तर्फे भावना आठवले( जी एम हेड एच आर – इ आर) ,संजीव मोहन ( सी जी एम सपोर्ट मॅनेजर), गौरव पतंगे ( मॅनेजर एच आर), अभिषेक पाटील ( सी एस आर ऑफिसर) तसेच साद फाउंडेशन संस्थेचे चे सर्व प्रमुख प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.रानसई येथील बहुतांशी आदिवासी कुटुंब हे भाजीपाला मोलमजुरी आणि मासेमारी व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहेत त्यांना त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू
मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यापुढे देखील विविध व्यवसायाच्या माध्यमातून येथील आदिवासींना रोजगार निर्माण होणार असेल तर नक्कीच आपण ओ एन सी सी चे सी एस आर फंडातून प्रयत्न करू असे उपस्थित मान्यवर भावना मॅडम आणि संजीव मोहन यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी रानसई ग्रामपंचायतचे सरपंच, उप सरपंच, सदस्य प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन कुलकर्णी सरांनी केले तर सूत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी केले.





