लांजातील कॅन्सर समूपदेशन केंद्र कर्करोग उच्चाटनासाठी मैलाचा दगड : सागीर देशमुख
लांजा : लांजातील नाना नानी निवास कॅन्सर समुपदेशन आणि मदत केंद्र हे कॅन्सरचे उच्चाटन करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन कॅन केअर फौंडेशनचे श्री. सागीर देशमुख यांनी केले.
स्वर्गीय रमा शेट्ये संचलित नाना नानी वंजारे वृद्धाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात केलेजय हिंद भुमी,जय शिवभुमी, जय महाराष्ट्र, 1मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय सौ.रमा नारायण शेट्ये टॣस्ट लांजा आणि कॅनकेअर रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “कॅन्सर मुक्त भारत” व उपेक्षित निराधार, अपंग, गरजू ज्येष्ठ नागरिकांनसाठी नाना नानी शांती निवास चा एक नवीन प्रवास या माफऀत आजचा कार्यक्रम नाना नानी शांती निवास या ठिकाणी घेण्यात आला. यासाठी प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद कदम तहसीलदार लांजा,श्री यशवंत भांड गटविकास अधिकारी लांजा,श्री विजय बंडगर गटशिक्षणाधिकारी लांजा,श्री श्रीराम स. वंजारे, श्री सागीर देशमुख, श्रीमती दीपिका रांबाडे,जेष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते व माजी तहसीलदार श्री जयवंत शेटये यांची उपस्थिती लाभली या कायऀकमाचे मुख्य वक्ते श्री सागीर देशमुख यांनी व्यसनमुक्ती व आजचे बदलती जीवनशैली वाढत जाणारी फास्टफुड चे प्रमाण अशा जीवनामुळे समाजत वाढत जाणारे कॅन्सर चे प्रमाण त्यामुळे शारीरिक , मानसिक,आथिऀक,व कौटुंबिक जीवनावर होणारे दुष्परिणाम यामुळे जीवन विस्कळीत होते, असे सांगितले.
कॅन्सर सारख्या दुधऀर आजारांवर मागदर्शन करणे व मदतीचा हातभार देणे याचे पूर्ण कायऀ लांजा येथील श्रीराम स.वंजारे यांच्या नाना नानी शांती निवास या वॣध्दाश्रमातून होणार आहे व विभक्त जीवनपद्धती,दोन पिढीमधील वाढत अंतर अशा प्रकारांमुळे वॣध्दांनच्या वाढत्या समस्या, यासाठी हा वॣध्दापकाळ सुखमय व्हावा,व आयुष्याच्या संध्याकाळी सुखमय, आनंदी, जीवन जगत आवडीनिवडी जोपासत वेळ घालवता यावा यासाठी नाना नानी शांती निवास चा नविन प्रवास समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी उपलब्ध आहे तरी उत्सुक गरजु व कॅन्सर पीडीत रूग्णांनी या जागेला जरूर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यासाठी १) श्रीमती दीपिका रांबाडे ८५३०७००१०२
२)श्री सागीर देशमुख ९३२२२९९७९५ यांच्याशी संपर्क साधण्यास कळवण्यात आले आहे.