‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून महिलेची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी : सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची सुमारे 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना 8 मे 2025 रोजी सकाळी 8.30 ते 27 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वा. कालावधीत कुवारबाव परिसरात घडली आहे.
प्रवीण (पूर्ण नाव ज्ञात नाही) आणि प्रवीण (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात रोहिणी मंदार गीते (45, रा. साईगण वृंदावन सोसायटी कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शुक्रवार 6 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर जाहिरात ठेवून ‘वर्क फ्रॉम’ होमची जाहिरात ठेवली होती. या जाहिरातीच्या नावाखाली स्केचर्स कंपनीमध्ये कामासाठी फिर्यादला टेलिग्राम अकाउंटवर माहिती देवून सुरुवातीला फिर्यादीला कस्टम ऑर्डरसाठी भरलेल्या रकमेवर त्यांना योग्य परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्या नंतर फिर्यादीने आपल्या बँक खात्यातून 10 लाख रुपये भरले होते.
रकमेचा कोणताही परतावा फिर्यादीला न देता त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत न करता त्यांची फसवणूक केली.





