महाराष्ट्रलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर
शिरगाव आरोग्य केंद्रात मोफत फिजिओथेरपी आरोग्य सेवा सुरु
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातून एक दिवस रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा डॉ. करणकुमार कररा, BPT. MPTH. फिजिओथेरपी (कार्डिओ पलमणारी) तज्ञ अलोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात येत आहे. गरीब व गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये (जिल्हा परिषद, रत्नागिरी) यांनी केले आहे.
प्राथमिक उपचारांसाठी या सुविधेचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.