महाराष्ट्रलोकल न्यूज

सर्पमित्र राजेश पाटील, मोहन पाटील यांनी दिले अजगरासह अन्य एका सापाला जीवनदान!

उरण (विठ्ठल ममताबादे ) : फ्रेंड्स ऑफ नेचर(फॉन) चिरनेर उरणचे उपाध्यक्ष राजेश पाटील व स्वयंसेवक मोहन पाटील यांनी दि. २ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९:१५ वाजता अंकुर क्लिनिक चिरनेर येथून भारतीय अजगर (Indian rock python)  पकडून येथे सुरक्षित अधिवासात सोडले.

यांचबरोबर दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी चिरनेर वनपरिक्षेत्रात त्यास मुक्त केले. त्याच वेळेस चिरनेर येथील सुरस बुकस्टॉल येथून त्यांच्या दुकानाजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी साप पाहिला व दुकानाच्या मालकाना त्याबाबत कल्पना दिली असता त्यांनी सर्पमित्र राजेश पाटील ह्यांना संपर्क केला. सर्पमित्र राजेश पाटील व मोहन पाटील ह्यांनी तो साप Slender coral स्नॅक (Calliophis melanurus) स्लेंडर कोरल सर्प (रातसर्प/पोवळा) असल्याचे सांगितले. स्लेंडर कोरल हा साप भारतात सर्वत्र आढळणारा आकाराने सर्वात छोटा विषारी साप असून दुर्मीळ साप आहे. त्यावेळेस फॉन संस्थेचे सदस्य विवेक हुदली व निकेतन ठाकूर हेही उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button