महाराष्ट्रराष्ट्रीयलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी
सागरी क्षेत्रातील अवैध मासेमारी, नौकांची घुसखोरी रोखणारी ड्रोन प्रणाली सुरु

- मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले उद्घाटन
मुंबई : राज्यात सागरी क्षेत्रात होणारी अवैध मासेमारी, घुसखोरी रोखण्यासाठी ‘ड्रोन देखरेख प्रणाली’चे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या ड्रोन प्रणाालीमुळे किनारपट्टीवरील ७ जिल्ह्यातील ९ सागर किनाऱ्यांची सुरक्षा आणखी मजबूत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. किनाऱ्यावर ड्रोन सुरक्षा पुरविण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ही समावेश आहे.