उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय
हरित ऊर्जा क्षेत्रातील आयनॉक्स कंपनीचा महाराष्ट्रासोबत २५००० कोटींचा गुंतवणूक करार
दाओस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ मध्ये हरित ऊर्जा क्षेत्रातील “आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स” कंपनीसोबत दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित २५००० कोटींच्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते.
यावेळी आयनॉक्स इंडियाचे संचालक सिद्धार्थ जैन, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सीईओ विपीन शर्मा आदी उपस्थित होते.