महाराष्ट्रराजकीय
प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना महेंद्रशेठ घरत यांचे निवेदन
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/vadettivar-780x470.jpeg)
उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे ) : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात पनवेल तालुक्यातील २७ गावातील घरे व शेतजमीन संपादित झालेली आहे.विमानतळाचे काम जोरात सुरु आहे परंतु प्रकल्पग्रसतांच्या पुनर्वसनाचे कामात अदानी समूह प्रकल्पग्रस्ताना त्रास देत आहे. या त्रासाला कंटाळून सर्व प्रकल्पग्रस्त १२ जुलै रोजी ओवेळेखाडीत जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/vadettivar-300x225.jpeg)
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या संदर्भात शासनदरबारी आवाज पोहोचवण्यासाठी अधिवेशनात लक्षवेढी मांडण्यासाठी विरोधीपक्षनेते श्री. विजयजी वडेट्टीवार यांची रायगड जिल्हा अध्यक्ष यांनी भेट घेऊन निवेदन दिले व या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची विनंती केली.