देवरुखच्या द्रोण हजारे याची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

Team RatnagiriLive
1 Min Read


देवरूख (सुरेश सप्रे ) : महाराष्ट्र राज्य कँरम असोशियनतर्फे दादर येथे घेणेत आलेल्या राज्य अजिक्यपद सब जुनियर कँरम स्पर्धेत साडवली येथील पी . एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ८वी चा विद्यार्थी द्रोण मोहन हजारे याची ‘वाराणसी’ येथे घेणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

त्याला वडील मोहन हजारे यांचेसह स्कूलचे सुपरवायझर कुंभार सर. P.T. शिक्षक अक्षय कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेबद्दल संस्थेचे सचिव सुभाष बने. संचालक रोहन बने. जिल्हा व तालुका कँरम असोशियनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment