मी रक्तदाता ग्रुप तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्ताची समाजात असलेली गरज, रक्तदान विषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, रक्तदान विषयी जनजागृती व्हावी तसेच गोर गरीब रुग्णांना रक्त मोफत मिळावे या अनुषंगाने काही तरुणांनी एकत्र येत मी रक्तदाता ग्रुपची स्थापना उरण तालुक्यातील चिरनेर येथे 5 जानेवारी 2018 साली केली. आज या संस्थेचे, ग्रुपचे वट वृक्षात रूपांतर झाले असून नवी मुंबई, मुंबई परिसरात सुद्धा या ग्रुपचे सदस्य सक्रिय असून कोणाला रक्ताची तातडीने गरज भासल्यास व्हाट्सअप वरील एका मेसेज वर त्वरित रक्तदाता त्या त्या ठिकाणी जाऊन त्वरित हजर राहुन लगेच रक्तदान करतो.या रक्तदान मुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. अनेकांना जीवनदान मिळाले आहे. मी रक्तदाता ग्रुपमुळे रक्तदान विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असून या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत रविवार दि.15/1/2023 रोजी श्री क्षेत्र गणपती मंदिर, चिरनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमांस प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती भास्कर मोकल, शुभांगी पाटील, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष घनशाम पाटील, शिवधन पतपेढी चेअरमन गणेश म्हात्रे, डॉ. प्राची नायर , केअर ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष महेश पाटील, ग्रामपंचात सदस्य धर्मेंद्र म्हात्रे, धनेश ठाकूर तसेच प्रशासकीय अधिकारी जितेंद्र चिरलेकर, तंटा मुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशीं, डॉ. एकता जोशी, दत्तात्रेय घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन करून मी रक्तदाता ग्रुप ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.तसेच शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
मी रक्तदाता ग्रुप उरण पनवेलचे सल्लागार श्रीधर(बापू )मोकल, सभासद – पंकज तांडेल, अतिष पाटील,मयूर गावंड, प्रशांत पाटील, दिवेश मोकल, आकाश म्हात्रे, अतिष नारंगीकर, आशिष मोहिते, अमित पाटील, प्रशांत जोशी, आणि इतर सर्व सभासद व डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबई ब्लड बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.एकूण 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले.