खेलो इंडिया जुदो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : अंधेरी (मुंबई ) येथे आयोजित मुंबई सिटी जुदो असोसिएशन यांनी खेलो इंडिया दस का दम स्पर्धा भरविली होती. या स्पर्धेत रायगडच्या मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत श्वेता मोरे हिने दोन गोल्ड मेडल तर तेजस्वी इंगोले हिने सिल्व्हर मेडल मिळवले. स्पर्धेत अमिता घरत, अमिषा घरत यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण 259 मुलींनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटक श्रीमती नीता ताटके (उपप्राचार्य -रूपारेल कॉलेज माटुंगा), श्रीमती हिमानी परब( मल्लखांब पट्टू )हे प्रमुख पाहुणे लाभले.
बक्षीस वितरक दीपाली दरेकर ह्या शिव (वेट लिपटिंग आणि राष्ट्रीय कबड्डी पट्टू,) , श्री स्वार्थ दास( सायकलिंग मध्ये छत्रपती पुरस्काराने सन्मानित) , श्रीमती दीप्ती (प्रिन्सिपल बिलाबोग इंटरनेशनल स्कूल, ), मिस अंगोळकर (क्लासिकला डान्सर कोरेओग्राफर बॉलिवूड पिचर ), तसेच यां स्पर्धेचे इंचार्ज पूनम समेल, संपदा फाळके, शिल्पा सेरींगर, रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रमुख पंच ओंकार घरत, राजश्री कोळी यांनी सदर स्पर्धेचे काम पहिले व ही स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली. तसेच कोच अजिंक्य भगत, सिहान राजुकोळी, महेंद्र कोळी गोपाळ म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.