तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील मुलींची सुवर्णपदकावर मोहर!
रत्नागिरी : शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलींनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले. यामध्ये कृपा प्रशांत मोरये, गायत्री यंशवत शेलार, गौरी अभिजित विलणकर, आदीष्टी अजय काळे, सई सदेश सावंत यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त या स्पर्धेत आद्या अमित कवितके, सार्थक सुरज चव्हाण, देवन अनिल सुपल, अमेय अमोल सांवत,
ऋत्विक गजानन तांबे यांना रौप्य पदक तर संस्कृती केतकर, श्रेयेश वाडेकर, मृदुला योगेश पाटील या खेळाडूंनी कांस्य पदक मिळवलं.
या सर्व खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा संघटना अध्यक्षा, राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तालुका समन्वयक मुश्ताक आगा यांनी कौतुक केलं तसंच सुवर्ण पदकप्राप्त खेळाडूंना पुढील राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना शाहरुख शेख, प्रशांत मकवना, मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले आहे