मोरया संघ संगमेश्वर ठरला क्रेझी चषकाचा मानकरी
संगमेश्वर : क्रेझी क्रिकेट संघ धामणी आयोजित तीन दिवसीय ओपन अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ या दिवशी अंतिम सामना झाला. यामध्ये अंतिम सामना मोरया संघ संगमेश्वर विरुद्ध यंग बॉईज संघ कसबा यांच्यात होऊन मोरया संघ संगमेश्वर क्रेझी चषकाचा मानकरी ठरला.
कसबा संघाने ५ षटकांमध्ये ३५ धावांची खेळी केली दरम्यान संगमेश्वर संघाला ३६ धावांचे लक्ष्य होते.
धावांचा पाठलाग करताना संगमेश्वर संघाने सहजपणे धावांचा यशस्वी पाठलाग करुन विजयी घोडदौड कायम ठेवली. मालिकावीर म्हणून मोरया संघाचा खेळाडू प्रदिप जोगळे यांच्या नावाची निवड करण्यात आली.
अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण सोहळ्याला धामणी ग्रामपंचायत चे सरपंच संतोष काणेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य प्रणिता घाणेकर, भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुका सरचिटणीस डॉ अमित ताठरे, प्रथमेश घाणेकर, अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समालोचन उल्हास घाणेकर यांनी जबाबदारी पार पाडली.