शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत संघर्ष ११ खेड संघ अजिंक्य
‘टीचर्स प्रीमियर लीग’ रत्नागिरी तालुका आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
रत्नागिरी : टीचर्स प्रीमियर लीग रत्नागिरीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत संघर्ष 11 खेड संघाने बाजी मारली. येथील चंपक मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील १६ संघानी सहभाग घेतला. संघर्ष ११ खेडने प्रथम क्रमांक रोख रु.१५५५५ व आकर्षक चषक, जयहिंद लांजा ब संघाने द्वितीय क्रमांक रोख रू.१११११/-व आकर्षक चषक, रत्नागिरी सुपरस्टार संघाने तृतीय क्रमांक रोख रु.४४४४/- व आकर्षक चषक तसेच लांजा स्टारने चतुर्थ क्रमांक रोख रु.३३३३/- आकर्षक चषक संपादन केले. तसेच या स्पर्धेत अनेक वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
१)अंतिम सामना सामनावीर-संतोष वाबळे (संघर्ष ११)
२) उत्कृष्ट फलंदाज, ऑरेंज कॅप व सर्वाधिक चौकार-उमेश जाधव-लांजा स्टार
३) उत्कृष्ट गोलंदाज व पर्पल कॅप-रमेश जाधे(खेड)
४) सर्वाधिक षटकार-मंजूर पटेल-जयहिंद लांजा ब
५) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक-गणेश सानप-(खेड)
६) मालिकावीर-अंकुश जाधव-लांजा ब
७) तृतीय क्रमांक सामनावीर संजय बैकर
ही क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील शिक्षक मित्र मंडळ व अनेक क्रिकेट शौकीन व सर्व मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.