जगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजस्पोर्ट्स
कर्नाटकचा अवघ्या ७ वर्षांचा महंमद आला आणि रत्नागिरीतून मॅरेथॉनचे मेडल घेऊन गेला!
महंमद झईद मत्तीहल्ली हा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमधील 'गोल्ड मेडलिस्ट'
रत्नागिरी : कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील महंमद झईद मत्तीहल्ली हा अवघ्या सात वर्षांचा मॅरेथॉनपटू रत्नागिरी रविवारी सकाळी झालेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणारे ठरला. महंमद 2022 मध्ये नेपाळमध्ये काठमांडू येथे झालेल्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. रत्नागिरीत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्याने स्पर्धेतील निर्धारित ५ किलोमीटरचे अंतर केवळ 25 मिनिटात पार केले आणि मॅरेथॉन स्पर्धेतील 21 वे मेडल गळ्यात अडकवून तो रत्नागिरीतून कर्नाटककडे जाण्यासाठी रवाना झाला.
रत्नागिरी येथे रविवारी कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरून देखील स्पर्धक सहभागी झाले होते. कर्नाटक सरकारने द्रोणागिरी पुरस्कारासाठी निवड केलेल्या अवघा सात वर्षांचा मोहम्मद झाईद हा देखील या स्पर्धेत सहभागी झाला होता. मोहम्मदने कर्नाटकसह कर्नाटकच्या बाहेर देखील आतापर्यंत वीस मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत पदके मिळवली आहेत. रत्नागिरीत रविवारी त्यांने मिळवलेले 21 वे पदक ठरले आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
रत्नागिरीत रविवारी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत रत्नागिरीच्या रस्त्यावर धावलेला महंमद हा 2022 मध्ये नेपाळमध्ये काठमांडू येथे झालेल्या साउथ एशियन फेडरेशनच्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल स्पर्धेमधील गोल्ड मेडलिस्ट आहे. तेव्हा तो अवघ्या पाच वर्षांचा होता.