स्पोर्ट्स
जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत यश भोंगले याचा विजेतेपदाचा दुहेरी धमाका!
रत्नागिरी : बॅडमिंटन एसोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विनित पाटील बॅडमिंटन अकादमीचा विद्यार्थी यश भोंगले याने १५ वर्षाखालील वयोगटात सिंगल्स व डबल्स असे दोन्ही विजेतेपद आणि १७ वर्षाखालील वयोगटात उपविजेतेपद पटकावले. दि. २८ व २९ जानेवारी रोजी देवरुख येथे ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत विनित पाटील बॅडमिंटन अकादमीचा आणखी एक विद्यार्थी सिद्धेश फणसेकर १९ वर्षाखालील वयोगटात उपविजेता ठरला. याचबरोबर स्वतः विनित पाटील यांनीही मेन्स डबल्समध्ये सुधीर कुमार यांच्यासह खेळताना विजेतेपद पटकवले.