स्पोर्ट्स
पाली येथे १४ जानेवारीपासून कबड्डी स्पर्धा
पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ स्पोट्र्स क्लबतर्फे दि. १४ व १५ जानेवारी रोजी भव्य कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. त्यामुळे पाली येथे कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
ही स्पर्धा श्री लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराशेजारी खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख ७ हजार ७७७ रूपये, द्वितीय क्रमांकास रोख ५ हजार ५५५ रूपये देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई व मालिकावीर अशी वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. यांना रोख रक्कम, आकर्षक चषक व टीशर्ट देऊन सन्मानीत केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी ७०० रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी अभिजीत ७६२०२७४०८२, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.