राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर
उरण (विठ्ठल ममताबादे ) : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनीयर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ, संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी जाहीर केला आहे.
संघ मुले (क्युरोगी प्रकार )
१) राकीब शेख (४५ कीलो खालील),
२) शाकीर खान (४८ किलो खालील),
३) गौरव शर्मा (५१ किलो खालील),
४) निहार नट्टर (५५ किलो खालील),
५) स्मित पाटील (५९ किलो खालील),
६) मानस असोले (६३ किलो खालील),
७) अभिशेक इरलेकर (६८ किलो खालील),
८) अभिशेक चव्हाण ( ७८ किलो खालील)
संघ प्रशिक्षक- निलेश जाधव, संघ व्यवस्थापक विजय डबरे
संघ मुली (क्युरोगी प्रकार)
१) मनीषा गायकवाड (४४ किलो खालील),
२) प्रीतीकुमारी चव्हाण (४६ किलो खालील),
३) वंदना मौर्या (४९ किलो खालील),
४) सिद्धी लांगी ( ५२ किलो खालील),
५) अनन्या चितळे (५५ किलो खालील),
६) अक्षता भगत (६८ किलो वरील)
संघ प्रशिक्षिका मुग्धा भोसले, संघ व्यवस्थापक ओमकार पिंगळे
पुमसे प्रकार ( ज्युनियर मुले ) वैयक्तिक :- मानस असोले, ग्रुप :- अभिषेक चव्हाण, तनिष कोनकर, दक्षय ठोंबरे
पुमसे प्रकार (ज्युनियर मुली ) वैयक्तिक :- अनन्या चितळे, ग्रुप :- अनन्या चितळे, गायत्री भंडारे, रतिका अहुजा
पुमसे प्रकार (सिनीयर मुले ) ४० वर्षाखालील वैयक्तिक :- प्रशांत घरत
पुमसे प्रकार ( सिनीयर मुले) ५० वर्षाखालील वैयक्तिक :- राकेश जाधव
पुमसे प्रकार (सिनीयर मुली) ३० वर्षाखालील वैयक्तिक :- सेजल कानेकर
पुमसे प्रकार (सिनीयर मुली) ४० वर्षाखालील वैयक्तिक :- मुग्धा भोसले
पुमसे प्रकार (सिनीयर जोडी) ३० वर्षावरील, प्रशांत घरत, मुग्धा भोसले
ज्युनियर संघ प्रशिक्षक- पुनीत पाटील, संघ व्यवस्थापक सुनील म्हात्रे,सिनीयर संघ प्रशिक्षक प्रभाकर भोईर, संघ व्यवस्थापक सदानंद निंबरे.
या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वर्णभारती इंडोर स्टेडीयम विशाखापटनम आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व खेळाडूंचा मागील ४० दिवस रोज ८ ते १० तास सराव सुरु असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी दिली आहे.