राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वरला तब्बल १८ पदके!
सहा सुवर्ण ३ रौप्य ९ कास्य पदकांचा समावेश
देवरूख (सुरेश सप्रे) : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं ३२ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद क्युरोगी स्पर्धा व आठवी राज्यस्तरीय पूम्से स्पर्धा एस.वी.जे.सी.टी. स्पोर्ट्स अकॅडमी डेरवण, चिपळूण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, निवे तायक्वांडो क्लब, पी.एस. बने तायक्वांडो क्लबच्या खेळाडूंनी जिल्हा संघाचे नेतृत्व केले. यामध्ये फाईट या प्रकारामध्ये सानवी रसाळ हिने ३८ ते ४१ गटात रौप्य पदक प्राप्त केले व स्वराली शिंदे हिने २१ ते २४ गटामध्ये कास्य पदक प्राप्त केले. या दोघींनी अतिशय उत्कृष्ट फाईटचे प्रदर्शन करून जिल्ह्याला पदक प्राप्त करून दिले. पुमसे या प्रकारामध्ये, साहिल जागुष्टे याने 2 सुवर्ण,1 रौप्य, 2 कांस्य, अधिराज कदम 1 सुवर्ण, 1 कांस्य, आयुष वाजे 1 सुवर्ण, 1 कांस्य, दुर्वा जाधव 1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य, श्रावणी इप्ते=1 सुवर्ण,1 कांस्य, सान्वी रसाळ 1 कांस्य, पदक पटकावली.
या यशस्वी खेळाडूंचा देवरूख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार करण्यात आला. त्यावेळचा माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, चिन्मय साने. सौ. पूनम चव्हाण, अविनाश जाधव, सुमित पवार, राज रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणुन निवड झालेले स्वप्निल दांडेकर याला देवरुख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पदक पटकाविलेल्या खेळाडूंना चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम अकॅडमी आधारस्तंभ माजी आम. सुभाष बने माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख उपनगराध्यक्ष वैभव पवार राज्य संघटना कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा सचिव लक्ष्मण के. तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू, निवे तायक्वांडो क्लबचे अध्यक्ष श्रीकांत यादव, क्लब सदस्या अनुजा नार्वेकर आशिष रसाळ, सोहम लाड आदींनी शुभेच्छा दिल्या.