राज्य तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे ना. उदय सामंत यांच्याकडून कौतुक
रत्नागिरी : रत्नागिरीच्या ४ खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली होती. एस. आर. के. तायक्वांदो क्लबच्या अमेय सावंत याने सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील आपलं स्थान निश्चित केलं. तर गणराज तायक्वांदो क्लबची गायत्री यशवंत शेलार हिला रौप्यपदक मिळालं. ना. उदय सामंत यांनी या दोनही खेळाडूंच्या घवघवीत यशाबद्दल कौतुक केलं.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दि.26 ते 28 जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडू सहभागी झाले होते.
या खेळाडूंच्या या यशाबद्दल माजी उपनगराध्यक्ष श्री.राजन शेटे तसच श्री. बाबू म्हाप यांनीही दोन्ही खेळाडू चे कौतुक केले. जिल्हा संघटना अध्यक्ष, राज्य संघटना खजिनदार आणि खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा,कोषाध्यक्ष शशांक घडशी, मिलिंद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना एसारके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष आणि प्रमुख प्रशिक्षक शाहरुख शेख आणि गणराज तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष तसच प्रमुख प्रशिक्षक प्रशांत मकवना यांचे मार्गदर्शन लाभले आहे.