दापोलीतील खुल्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील युवा तायक्वांदो उपविजेता
थोड्या थोडक्या नव्हे तब्बल ५३ पदकांची कमाई
रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित दापोली तालुका तायक्वांडो यांच्या वतीने सेवाव्रती सभागृह दापोली येथे 16 वी रत्नागिरी जिल्हा खुल्या तायक्वांडो स्पर्धा दि. 25 ते 27 एप्रिल दरम्यान झाली. या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे येथील खेळाडूंनी 53 पदकांची कमाई करत घवघवीत यश मिळवले आहे.
या स्पर्धेत नुपूर दप्तरदार 2 सुवर्ण 1 रौप्य, तुषार पाटील 1 सुवर्ण 1रोप्य 1कास्य, वेदांत देसाई 1 सुवर्ण, उपर्जना कररा, 2 सुवर्ण 2कास्य, मंथन आंबेकर. 3 सुवर्ण, अर्जुन पवार 2सुवर्ण 1 रोप्य, अस्मि साळुंखे. 2 सुवर्ण 1 रौप्य 1कास्य, सई सुवारे 3 सुवर्ण 1 कास्य, आराध्य तहसीलदार. 1सुवर्ण 1 रौप्य 1 कास्य, योगराज पवार 2 सुवर्ण 1कास्य, भार्गवी पवार. 3 सुवर्ण1 रोप्य, मयुरी कदमने 4 सुवर्ण पदके पटकावली.
या स्पर्धेत संस्कृती सपकाळ 4 सुवर्ण 1 रोप्य 1कास्य, श्रुती काळे, 2 सुवर्ण 1कास्य, प्रीत पोतदार. 1 सुवर्ण, रुही कररा 1सुवर्ण, प्रतीक पवार 1सुवर्ण, सोनाक्षी रहाटे 1रोप्य एकूण 35 सुवर्ण 8 रोप्य
10 कास्य
अशी 53 पदके संपादन करून उपविजेता चषक मिळवल्याचे जिल्हा स्पर्धेचे बेस्ट फायटर ट्रॉफी मयुरी मिलिंद कदम सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे ब्लॅक बेल्ट 2दान महिला प्रशिक्षक म्हणून सौ शाशिरेखा कररा अमित रेवतकुमार जाधव ब्लॅक बेल्ट 2 दान यानी संघ प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेसाठी जिल्हा भरातून सुमारे 300 ते 400 खेळाडू सहभाग घेतला. या स्पर्धेतील खेळाडूंना महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घाडशी संजय सुर्वे सचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक )युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर अध्यक्ष राम कररा यांनी अभिनंदन करून सर्व विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.