देवरुखमध्ये २२ पासून तालुकास्तरीय कबड्डी व रस्सीखेच स्पर्धा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
देवरूख (सुरेश सप्रे) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर तालुका पंचायत समिती माजी उपसभापती छोट्या गवाणकर मित्र मंडळ व देवरूख उ.बा. ठाकरे शिवसेना विभाग यांच्यावतीने दि. २२ व २३जानेवारी या दिवशी तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात तालुक्यातील स्थानिक खेळाडू सहभागी होणार आहेत.प्रथम विजेत्यांना रोख रक्कम १५हजार व आकर्षक चषक तर उप विजेत्यांना १० हजार तर रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्यांना ५हजार व उप विजेत्यांना ३ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळावे या उदिष्टाने या स्पर्धा भरविण्यात आल्या आहे.
या स्पर्धेत जिल्हा कबड्डी असोसिएशन कडे रजिस्टर असलेल्या खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये.. तसेच या स्पर्धेत भाग घेणारे सर्व खेळाडूंना मोफत जेवणाची सोय करणेत आली आहे.. तालुक्यातील निमंत्रतीत संघाना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नोंदणी १८ जानेवारी पर्यत करावयाची आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोळजाई देवी मंदीराजवळील मैदान येथे पार पडणार आहे.