खेडमध्ये उद्या नारी सन्मान सोहळा ; ना. आदिती तटकरे यांची उपस्थिती

रत्नागिरी, दि. २६ : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत खेडमध्ये नारी शक्ती सन्मान सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे.
ना. आदिती तटकरे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 27 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता सुतारवाडी, ता. रोहा, जि. रायगड येथून वाहनाने खेडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, खेड यांच्या वतीने आयोजित जनविश्वास सप्ताह निमित्त नारी सन्मान कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- श्रीमान द. ग. तटकरे सभागृह, खेड) दुपारी 12 वाजता खेड येथून मंडणगडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 1 वाजता मंडणगड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मंडणगडने आयोजित जनविश्वास कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : म.या.चें.ट्रस्ट गवळी समाज सभागृह, भिंगळोली, मंडणगड). सोईनुसार मंडणगड येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण.