ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय

कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी ४२ टेबलांवर सुरू ; निकालाबाबत उत्सुकता

नवी मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर तसेच मुंबई पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतील नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे आज सकाळी सुरू झाली.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल आहेत. मुंबई पदवीधरसाठी 28 आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 14 टेबलवर मतमोजणी सुरु झाली आहे.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४ रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी  ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण 1 लाख 20 हजार ७७१ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण ७६ हजार ६४६ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
 कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ  ६४.१४%

ठाणे- ५८.४२%, पालघर- ६३.२३%, रायगड- ६७.५९%, रत्नागिरी-६९.१४%, सिंधुदूर्ग-७९.८४% एकूण- ६४.१४%

मुंबई पदवीधर मतदारसंघ ५६.०१%

मुंबइ शहर- ५७.६८%   मुंबई उपनगर-५५.४४%       एकूण-५६.०१%

मुंबई शिक्षक मतदारसंघ ७५.७७%

मुंबइ शहर- ८०.१२%  मुंबई उपनगर-७४.९५%       एकूण-७५.७७%

विधान परिषद कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदार संघाची मतमोजणी अपडेट
तीनही मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण.
कोकण पदवीधर मतदारसंघ
• 321 केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण.
• एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या.
• आता प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु. एकूण 4 फेऱ्या होतील.
• त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल.

मुंबई पदवीधर
• एकूण 67 हजार 644 मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली.
• मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु.
• त्यानंतर कोटा ठरेल.

मुंबई शिक्षक मतदारसंघ
• एकूण 12 हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे.
• यातील 402 मतपत्रिका अवैध आढळल्या.
• 5800 हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे.
• प्रत्यक्ष मतमोजणी सुरु सुरुवातीस पहिल्या पसंतीची मते त्या त्या उमेदवारांना वाटप करण्याचे काम सुरु होईल.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button