रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हिसार-कोईमतूर एक्सप्रेसच्या थांब्याला मुदतवाढ
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हिसार जंक्शन ते कोईमतुर या साप्ताहिक एक्सप्रेसला (22475 / 22476) थीवीम स्टेशनवर देण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील थांब्याला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हिसार जंक्शन ते कोईमतुर या दरम्यान कोकण रेल्वे मार्गे आठवड्यातून एकदा ही एक्सप्रेस गाडी धावते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील थिवीम स्टेशनवर या गाडीला दिनांक 19 ऑगस्ट 2022 पासून सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला होता.
आता पुन्हा पुढील सूचना मिळेपर्यंत या गाडीच्या प्रायोगिक तत्त्वावरील थांब्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.