महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
गावडे आंबेरे समुद्रकिनारी रंगली नौकानयन स्पर्धा

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील गावडे-आंबेरे गावातील समुद्र किनारी विठ्ठल रुखमाई उत्सव मंडळ व पूर्णगड पोलीस यांचे संयुक्त विद्यमाने नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये पूर्णगड, गावडे आंबेरे, गावखडी, गणेशगुळे या गावातील एकूण 12 संघांनी आपला सहभाग नोंदविला.
या प्रसंगी, सागरी सुरक्षा टोल फ्री क्र. 1093 व डायल 112 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.