‘तुतारी एक्सप्रेस’मध्ये विसरलेला लाखो रुपयांचा ऐवज प्रवाशाला केला परत!
कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी घडवले प्रामाणिकपणे दर्शन
लांजा : कोकण रेल्वेच्या सतर्क तिकीट तपासणी निरीक्षक टीम ने तुतारी एक्सप्रेसमध्ये विसरून गेलेली लाखो रुपये किमती ऐवज असलेली बॅग लांजातील प्रवाशाची परत करून प्रमाणिकपणाचे दर्शन घडवले आणि कोकण रेल्वेची प्रतिमा उंचावण्यात मोलाचे योगदान दिले.
आज दि. २० मार्च २०२३ रोजी दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसमध्ये सेवा बजावत असतानाकरीत असताना स्लीपर कोच मध्ये एक सुटकेस आढळून आली तेव्हा तिकीट तपासनीस श्री. नंदु मुळ्ये यांनी सदर बॅगसंबंधी आजुबाजूच्या प्रवाशां जवळ चौकशी केली परंतु कोणीही संपर्क केला नाही तेव्हा त्यांनी कमर्शिअल कंट्रोल मध्ये कळविले तसेच बॅगेत मिळालेल्या आधार कार्ड वरून त्यांचा PNR क्रमांक मिळवला व विलवडे स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क केला असता त्या प्रवाशांनी तिथे चौकशी केली होती. लगेच त्या प्रवाशांनी श्री मुळ्ये यांच्याशी संपर्क साधला व बॅगमधील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम ₹१,००,०००/- सुरक्षित असल्याचे त्यांना सांगितले व सदर बॅग RPF/KKW यांच्याजवळ सुपूर्द केली ताबडतोब RPF यांनी प्रवासी सौ.जाधव यांना फोन करून कळवून ओळख पटवून देऊन कणकवली येथे समक्ष भेटून बॅग नेण्यास सांगितले. सदर प्रसंगी नंदु मुळ्ये व सहकारी तसेच अजित परब व अटेंडट तानवडे उपस्थित होते.