आंगणेवाडी यात्रा, होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर ३ फेब्रुवारीपासून विशेष गाडी!

रत्नागिरी : सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रा आणि होळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सुरतकल (मंगळूरू) दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा कोकण रेल्वेने केली आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०१४५३ लोकमान्य टिळक टर्मिनस सुरतकल विशेष गाडी ०३ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री १०:१५ ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ३:३० ला सुरतकल येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ०१४५४ सुरतकल- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी ०४ फेब्रुवारी २०२३ ते ०१ एप्रिल २०२३ पर्यंत प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ७:४० ला सुरतकल येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेणार आहे.
ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, मडगाव, कारवार, गोकर्ण, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका, उडुपी आणि मुलकी या स्थानकांवर थांबणार आहे.

या गाडीला एकूण १७ डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये टू टायर एसी एक, थ्री टायर एसी तीन, स्लीपर दर्जाचे आठ, सेकंड सीटिंग चे तीन तर एस एल आर दोन असे कोच जोडले जाणार आहेत.