रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकणातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/03/15_03_2024-railway_llb_coch11-780x470.jpg)
रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गे सुरू करण्यात आलेल्या वास्को द गामा बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आधी उन्हाळी हंगामासाठी मर्यादित कालावधीसाठी ही विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. रेल्वेने आधी जाहीर केल्याप्रमाणे दिनांक 17 एप्रिल ते 8 मे 2024 या कालावधीसाठी जाहीर केली होती. मात्र, आता या गाडीच्या फेऱ्या दिनांक 15 मे ते 12 जून 2024 पर्यंत चालणार आहेत. उत्तर बिहारमधील मुजफ्फरपुर जंक्शन ते वास्को दरम्यान ही गाडी दिनांक 18 मे ते 15 जून 2024 या कालावधीत थांबणार आहे.
गोव्यातील वास्को-द-गामा जंक्शन येथून सुटलेली ही गाडी मडगाव, थिवी, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल कल्याण नाशिक मार्गे बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत जाते.