कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच हिसार ते कोईमतूर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव (22908) या गाडीला हापा येथून 29 मार्चपासून तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना (22907) दिनांक 31 मार्च पासून स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाणार आहे.
याचबरोबर हिसार ते कोईमतुर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला (22475) या गाडीला हिसार येथून सुटताना दि. ५ ते २६ एप्रिल २०२३ या कालावधीत तर कोयमतुर ते हिसार या फेरीसाठी (22476) दिनांक आठ ते 29 एप्रिल २०२३ या कालावधीसाठी टू टायर वातानुकूलित श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे.
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी वरील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.