कोकण रेल्वेमार्गे २३ एप्रिल रोजी दिल्लीसाठी वन-वे स्पेशल सुटणार!
कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेडला थांबे
रत्नागिरी : मंगळूरु जंक्शन नजीकचे कासरगोड ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी वनवे स्पेशल गाडी दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी सुटणार असून कोकण रेल्वे मार्गावर ती दुसऱ्या दिवशी 24 एप्रिलला येणार आहे.
मंगळुरू जंक्शन जवळील कसारागोड (06007) ही वनवे स्पेशल गाडी दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता पोहोचेल.
एसी थ्री टायर, दहा स्लीपर कोच, दहा जनरल सेकंड सेटिंग तसेच लगेच काम ब्रेक व्हॅन असे मिळून एकूण 23 डब्यांची गाडी धावणार आहे.
ही गाडी मडगाव, करमाळी थिवी कुडाळ, कणकवली रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा पनवेल, कल्याण, नाशिक मार्गे इटारसी मथुरा आदी थांबे घेत दिल्लीतील हजरत निजामुद्दीनला तिचा प्रवास संपणार आहे.