कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!! होळीसाठी चिपळूणपर्यंत मेमू लोकल लोकल धावू लागली
रोहा ते चिपळूण दरम्यान मार्चपर्यंत होणार 22 फेर्या
रत्नागिरी : होळीसाठी मुंबई पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने होळी स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. त्यात नव्याने जाहीर केलेल्या आठ गाड्यांमध्ये चिपळूण पर्यंत धावणाऱ्या मेमू स्पेशल लोकल ट्रेनचा देखील समावेश आहे.
दि. 25 मार्च 2024 रोजी धुलिवंदन अर्थात होळी सणातील मुख्य दिवस आहे. कोकणात होळीला मोठे महत्त्व असल्याने या कालावधीत रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातात.
- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | खेड रेल्वे स्थानकातून लवकरच होणार कंटेनर वाहतूक
होळीसाठी आणखी आठ विशेष गाड्या जाहीर
कोकण रेल्वे मार्गावर विविध ठिकाणाहून होळीसाठी ज्यादा गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोहा ते चिपळूण (01597/01598) या मेमू लोकल ट्रेनचा देखील समावेश आहे. या गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी आज दिनांक 8 मार्चपासूनच सुरू झाली आहे. दिनांक 30 मार्च 2024 पर्यंत मेमू लोकल ट्रेन रोहा ते चिपळूण मार्गावर एकूण 22 फेऱ्या करणार आहे. रोहा येथून ही गाडी 11 वाजून 05 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी दीड वाजता ती चिपळूण स्थानकावर पोहोचेल. चिपळूण येथून ही गाडी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी रोह्याला पोहोचेल. आठ डब्यांची ही अनारक्षित गाडी रोहा येथून पुढे दिव्यापर्यंत नियमित चालवली जात असल्याने चिपळूण येथून या गाडीने दिव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. याचबरोबर चिपळूणला येण्यासाठी ही गाडी रोहा येथून सुटण्याआधी सकाळी दिव्यावरून सुटत असल्याने चिपळूणला येताना देखील रोहा – चिपळूण असा मेमू लोकलने दिवा येथून चिपळूणपर्यंत थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.