रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!
कोकण रेल्वे मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांना डबे वाढवले
रत्नागिरी : होळी सणामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात येऊन या मार्गावरून धावणाऱ्या दूरपल्याच्या दोन एक्सप्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्ग धावणारी हापा ते मडगाव (22908) या गाडीच्या दिनांक 8 मार्च रोजी च्या फेरीसाठी तर मडगाव ते हापा(22907) या फेरीसाठी १० मार्च रोजी स्लीपरचा एक डबा वाढवण्यात आला आहे.
याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 8 मार्च रोजीच्या तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) क्या दि. 12 मार्च रोजी स्लीपरचा एक डबा वाढवण्यात आला आहे.
होळीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी वाढल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.