रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेसला जादा डबा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा- मडगाव एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढविण्यात आला आहे. ‘कोरे’ मार्गे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
हापा- मडगाव (22908) मार्गावर धावताना दिनांक 4 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 जानेवारी या कालावधीसाठी तर मडगाव हापा (22907) मार्गावर दवाताना या दिनांक ६ ते २७ जानेवारी 2023 या कालावधीत स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडण्यात येणार आहे.