महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका एक्सप्रेसला अतिरिक्त कोच
रत्नागिरी : उन्हाळी पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाच कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी कायम असल्याने या मार्गावरून धावणाऱ्या दूर पल्ल्याच्या आणखी एका एक्सप्रेसला अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते तिरुअनंतपुरम सेंट्रल (12432/12431) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला वातानुकूलित थ्री टायर दर्जाचा एक जादा डबा जोडण्यात येणार आहे.
हा बदल हजरत निजामुद्दीन स्थानकावरून दि. 28 मे तसेच 4 जून रोजी च्या फेरीसाठी लागू होणार आहे. याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन या प्रवासासाठी दिनांक 30 मे तसेच 6 जून 2023 या दिवशी सुटणाऱ्या फेरीसाठी वातानुकूलित थ्री टायर दर्जाचा अतिरिक्त कोच जोडला जाणार आहे.
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होऊ लागल्यामुळे गरजेनुसार या मार्गावरील गाड्यांना अतिरिक्त कोच सोडले जात आहेत. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला देखील जादा डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.