महाराष्ट्रलोकल न्यूज
खेड तालुक्यातील अस्तान मार्गावरील दरड हटवली

खेड : पावसामुळे खेड तालुक्यातील असताना मार्गावर कोसळलेली दरड युद्ध पातळीवर प्रयत्न करून हटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन दिवसापूर्वी कोसळलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील अस्तान रोडवरील दरड कोसळून त्या परिसरातील संपर्क व्यवस्था कोलमडली होती.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दरड काम हाती घेतले होते. मात्र मोठ्या प्रमाणावर दगड माती रस्त्यावर आल्यामुळे जेसीबी मशीनच्या मदतीने मार्गावर कोसळलेली दरड हटवण्यात आली. यामुळे या मार्गावरील वाहतुकीतील अडथळा दूर झाला आहे.