जागतिक पर्यावरण दिनी कोकण रेल्वेचा ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प
नवी मुंबई : यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन कोकण रेल्वेने अनोख्या उपक्रमांनी साजरा केला. कोकण रेल्वेने आपली कार्यालये आणि कोकण रेल्वेच्या मार्गाच्या परिसरात तब्बल 5हजार झाडे लावण्याचा संकल्प केला. कोकण रेल्वेच्या या उपक्रमाची सुरुवात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत झाली.
गेल्या काही काळात वातावरणातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे.तापमान वाढीचे दुष्परिणाम समोर येत असताना त्यावर उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेत कोकण रेल्वेने या वर्षी एका नव्या संकल्पाची घोषणा केली.कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या संकल्पनेतून कोकण रेल्वेची कार्यालये आणि मार्ग यांच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्याचे निश्चित करण्यात आले.पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत या उपक्रमाची सूरवात करण्यात आली.
यावेळी झालेल्या समारंभास कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा ,वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी,अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर,वन संरक्षक ठाणे के प्रतिभा आदी मान्यवर उपस्थित होते.सगळ्यांनी एकत्र येत शाश्वत विकासासाठी कोकण रेल्वे करत असलेल्या या या प्रयत्नांना साथ द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.