पुणे, पनवेलसह एलटीटी येथून कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्या धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चार समर स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पुढील महिन्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार ० १) ०१२ ११ / ० १२ १२ ही गाडी पुणे ते सावंतवाडी दरम्यान लावणार आहे. ही साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून दर रविवारी दिनांक 2 एप्रिल ते 4 जून 2023 या कालावधीत रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी सुटून सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी येथून दिनांक पाच एप्रिल ते सात जून 2023 या कालावधीत दर बुधवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती पुण्याला रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.
पुणे ते सावंतवाडी या प्रवासात ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, विलवडे, नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग तसेच कुडाळ हे थांबे घेणार आहे. या गाडीला एकूण 22 डबे जोडले जाणार आहेत.
२) समर स्पेशल दुसरी गाडी (01216/01215) सावंतवाडी रोड- पनवेल- सावंतवाडी अशी धावणार आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावेल. ही गाडी दिनांक 3 एप्रिल ते ५ जून 2023 या कालावधीत दर सोमवारी धावेल. ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला रात्री ती साडेआठ वाजता पोहोचेल. पनवेल सावंतवाडी मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 4 एप्रिल ते ६ जून 2023 या कालावधीत दर मंगळवारी धावणार आहे. पनवेल येथून ही गाडी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती सावंतवाडी रोड स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी आपल्या संपूर्ण प्रवासात कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा या स्थानकांवर थांबणार आहे. ही गाडी एकूण 22 डब्यांची धावणार आहे.
३) तिसरी समर स्पेशल गाडी 01213/01214 ही पनवेल ते करमाळी मार्गावर आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही गाडी दिनांक 3 एप्रिल ते पाच जून 2023 या कालावधीत धावणार आहे. ही गाडी पनवेल येथून दर सोमवारी चालवली जाणार आहे. पनवेल येथून ही गाडी रात्री साडेनऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती गोव्यात कर्माला पोहोचेल. करमाळी येथून ही गाडी दिनांक 4 एप्रिल ते सहा जून 2023 या कालावधीत आठवड्यातील दर मंगळवारी चालवली जाईल. ही गाडी करमाळी येथून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती पनवेलला रात्री साडेआठ वाजता पोहोचेल.
ही विशेष गाडी रोहा माणगाव वीर खेड चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थीवी या स्थानकावर थांबा घेणार आहे ही गाडी देखील 22 डब्यांची चालवली जाणार आहे.
४) कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेली चौथी समर स्पेशल गाडी 01463/01464 मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान चालवली जाणार आहे. ही गाडी देखील आठवड्यातून एकदाच धावणार आहे. दिनांक सहा एप्रिल ते एक जून 2023 या कालावधीत दर मंगळवारी ही गाडी धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस वरून ही गाडी सायंकाळी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ते अकरा वाजून वीस मिनिटांनी कन्याकुमारीला पोहोचेल. कन्याकुमारी येथून ही गाडी आठ एप्रिल ते तीन जून 2023 या कालावधीत प्रत्येक शनिवारी धावणार आहे. ही गाडी कन्याकुमारी येथून दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.
ही गाडी आपल्या प्रवासात ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कासारगोड, कंनूर ही स्थानके घेत तिरुअनंतपुरममार्गे कन्याकुमारीला जाणार आहे.