मडगाव -नागपूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या भक्तांवर गजानन महाराज प्रसन्न!
विदर्भ-कोकण जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष ट्रेनला शेगाव स्थानकावर थांबा मंजूर
रत्नागिरी : विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीतून प्रवास करणाऱ्या भक्तांवर शेगावचे गजानन महाराज प्रसन्न झाले आहेत. या एक्सप्रेस गाडीला ४ जानेवारी २०२३ पासून शेगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
01139/01140 हे नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण पट्ट्यातून शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन रेल्वेने नागपूर -मडगाव विशेष एक्सप्रेसला दिनांक 4 जानेवारी 2023 पासून थांबा मंजूर केला आहे. नागपूर मडगाव मार्गावर धावताना ही गाडी घर बुधवार आणि शनिवारी सायंकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर येईल. या गाडीला शेगाव स्थानकावरील थांबा देण्या संदर्भातील अंमलबजावणी मडगाव नागपूर मार्गावरील प्रवासात दिनांक 5 जानेवारी 2023 पासून होईल.
मडगाव ते नागपूर मार्गावर धावताना ही गाडी आठवड्यातील दर गुरुवार आणि रविवारी सायंकाळी तीन वाजून 35 मिनिटांनी शेगाव स्थानकावर पोहोचेल.