रत्नागिरी-मडगाव एक्सप्रेस ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार!
मागील काही महिन्यांपासून बंदच आहे रेल्वे सेवा
रत्नागिरी : मडगाव ते रत्नागिरी मार्गावर धावरणारी डेली एक्सप्रेस दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत अधिकृत सूचना प्रसिद्ध करून माहिती देण्यात आली आहे. या मार्गावरील देखभाल आणि दुरूस्तीच्या कामानिमित्त सेवा मर्यादित काळासाठी बंद राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
कोकण रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मर्यादित काळासाठी बंद ठेवण्यात आलेली रत्नागिरी – मडगांव -रत्नागिरी सेवा बंद असण्याचा काळ वाढविण्यात आाला आहे. आता डेली एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी,असे कोकण रेल्वेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी – मडगाव – रत्नागिरी या मार्गावरील दुरूस्ती आणि देखभाल करण्याचे काम केले जाणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.